मुंबईत आज सकाळपर्यंत चाळीस हजार गणपतींचे झाले विसर्जन
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेली दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर गुरुवारी (28 सप्टेंबर )मुंबईसह उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरांमध्ये विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला आज सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईतल्या वेगवेगळ्या चौपाट्यांवर 32190
घरगुती गणपतीचे ,444 गौरीचे आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या 6601 अशा एकूण 39235 गौरी – गणपतीला लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांकडून जड अंतकरणाने साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.
त्यापैकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 739, घरघुती गणपतीचे 10198 तर 160 गौरीचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी
जय्यत तयारी करण्यात आली होती.
पालिकेचे सुमारे 10 हजार कर्मचारी, 71 नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयी सुविधांसह सुसज्ज होते . यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी 69 नैसर्गिक स्थळांसह एकूण 198 कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनासाठी
मुंबईतील चौपाट्यावर उसळणारी गर्दी पाहता कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये,
तसेच घातपाती कारवायांना आळा घालण्यासाठी 19 हजार पोलिसांचा चौख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
एसआरपीएफ ,क्युआटि,फोर्स वन,
शीग्र कृती दल यांची अतिरिक्त कुमक राखीव ठेवण्यात आली होती. होमगार्ड आणि स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मदतही यावेळी घेण्यात आली होती .गर्दीवर साध्या वेशातही नजर ठेवण्यात आली होती तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने गर्दी, विसर्जन मार्ग तसेच विसर्जन स्थळाची तपासणी करण्यात आली होती. विसर्जन मार्गातील संविधानशील ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सायंकाळी मुंबईतील घरघुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत गणेशभक्तांनी मोठया जड अंतकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजा
सकाळी १० वाजता मंडपाबाहेर पडला.
अखेर २३ तासांनी गिरगाव चौपाटीवर महाआरती करून बाप्पाला साश्रू नयनांनी गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटी गणेशभक्तांनी फुलून गेली होती.
दरम्यान लालबागच्या राजाला कोळी बांधवांकडून दरवर्षीप्रमाणे बोटींची सलामी देण्यात आली. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी होत्या. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन झालं.Forty thousand Ganpatis have been immersed in Mumbai till this morning
नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असल्याने अनेक भाविक लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी येत असतात. तसंच, इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्तेही या मिरवणुकीत सहभागी होतात. त्यामुळे या राजासाठी गर्दी वाढत जाते. गर्दीत सहभागी होता न येणारे अनेक भाविक गिरगाव चौपाटीवरच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी थांबले होते.बाप्पाच्या विसर्जनानिमित्त पावसानेही काल हजेरी लावली. पावसाच्या आगमनातही बाप्पाच्या विसर्जनासाठी असंख्य भक्त रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लालबाग, परळ, भायखळासह गिरगाव चौपाटीच्या दिशेकडचे सर्व रस्ते खुलून गेले होते.
ML/KA/PGB
29 Sep 2023