चौथी न्यूक्लियर मिसाईल सबमरीन लॉंच, भारताची संशोधन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारताने संशोधन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. भारताने नुकतीच चौथी न्यूक्लियर-शस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) लाँच केली आहे. विशाखापट्टणमच्या शिप बिल्डिंग सेंटरमध्ये या नवीन सबमरीनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. यामुळे भारताच्या आण्विक प्रतिरोध क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
भारतातील आण्विक क्षेपणास्त्रांवरील हा प्रकल्प देशाच्या इतर महत्वाकांक्षी योजनांशी संबंधित आहे. सरकारने दोन आण्विक-सशस्त्र आक्रमण सबमरीन बांधण्यास देखील मान्यता दिली आहे, ज्यामुळे हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात भारताचे स्थान अधिक बळकट होईल.
ML/ML/PGB 23 Oct 2024