श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची हत्या, पत्नी आणि मुलांसमोर घरात झाडल्या गोळ्या

 श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची हत्या, पत्नी आणि मुलांसमोर घरात झाडल्या गोळ्या

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघ येत्या २७ तारखेपासून ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात वन डे मालिका खेळवली जाईल. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच श्रीलंकेत एक धक्कादायक घटना घडली. श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार धम्मिका निरोशनवर त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री (१६ जुलै २०२४) गाले येथील अंबालांगोडा येथे त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याबाबतची माहिती श्रीलंकन माध्यमांनी दिली.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मिका त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सध्या या गुन्ह्याचा कसून तपास सुरू आहे, मात्र या गुन्ह्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.डावखुरा खेळाडू धम्मिकाने २००० मध्ये श्रीलंकेच्या १९ वर्षाखालील संघात पदार्पण केले. त्याने २००२ मध्ये न्यूझीलंडच्या धरतीवर झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचे कर्णधारपद सांभाळले. तेव्हा पाच सामन्यांमध्ये सात बळी घेण्यात त्याला यश आले. १२ प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या निरोशनाने २०० हून अधिक धावा आणि १९ बळी घेतले आहेत. या घटनेमुळे क्रिडाविश्व हादरले आहे. Former Sri Lankan captain murdered, shot at home in front of wife and children

ML/ML/PGB
17 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *