मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन मंजूर

 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन मंजूर

मुंबई,दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. ईडीने त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती.

मुंबई शेअर मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांच्या फोन टॅप प्रकरणी त्यांना ईडीने 19 जुलै रोजी अटक केली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले होते.

ऑगस्टमध्ये ट्रायल कोर्टाने या प्रकरणात पांडेचा जामीन फेटाळला होता आणि सांगितले होते की, उपलब्ध सामग्रीवरून असे दिसून आले आहे की, ते NSE मधील कॉल रेकॉर्डिंग आणि मॉनिटरिंगच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होते, आणि त्यांचा थेट कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद होत होता.

फोन टॅपिंग प्रकरणी एनएसईच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यांना 28 सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता.

SL/KA/SL

8 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *