माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन

ठाणे दि २९:– ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे माजी खासदार सतीश प्रधान यांचे आज दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले होते.
त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. ते तत्कालीन ठाणे नगर परिषदेवर निवडून आलेले शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष होते, त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य ही होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.