माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा दिला राजीनामा

पुणे: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा जाहीर केला.