माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचे निधन

 माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचे निधन

धाराशिव, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर येथील माजी आमदार नरेंद्र बाबुराव बोरगावकर यांचे आज पहाटे पुणे येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झालं .ते 87 वर्षे वयाचे होते.त्यांनी लातूर, बीड,धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही ते काही काळ काम करत होते . तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून ते कार्यरत होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पाच वाजता तुळजापूर येथील मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ML/ML/SL

20 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *