माजी आमदार डॉ देवीसिंह शेखावत यांचे निधन
पुणे,दि.२४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी आमदार आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती डॉ देवीसिंह शेखावत (89) यांचे आज पुण्यात वृद्धपकाळाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी, हृदयविकाराचा धक्का आल्याने देवीसिंह शेखावत यांना पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
मूळचे राजस्थान येथील डॉ देवीसिंह शेखावत महाराष्ट्रात अमरावतीत स्थायिक झाले होते.देवीसिंह शेखावत यांचा 7 जुलै 1965 रोजी प्रतिभा पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. काँग्रेसमधून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. डॉ. शेखावत 1992 ते 93 या कालावधीत अमरावती महानगर पालिकेचे पहिले महापौर होते. तसेच ते अमरावतीचे आमदार पण होते.
सुरुवातीच्या काळात देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापाक म्हणून काम पाहिलं होतं. 1972मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएचडी दिली होती. विद्या भारती शिक्षण संस्था या त्यांच्या संस्थेचे ही ते काम पाहत होते.
ML/KA/SL
24 Feb. 2023