माजी मंत्री शिवाजीराव कर्डीलेंचा उमेदवारी अर्ज दाखल

आहिल्यानगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून माजी मंञी शिवाजीराव कर्डिले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज साध्या पद्धतीने अर्ज भरून 29 ऑक्टोबर रोजी महायुतीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार असल्याचे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले. तसेच राहुरीच्या विद्यमान आमदारांनी आश्वासन पूर्ती न केल्याने आपला विजय नक्की होईल असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे भाजपावर नाराज असलेले सत्यजित कदम हेदेखील अर्ज भरण्यासाठी कर्डिले यांच्या बरोबर दिसले.
ML/ML/SL
24 Oct. 2024