माजी आरोग्यमंत्र्यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा बेपत्ता झाल्याचा निनावी फोन पुणे पोलीस कंट्रोल रुमला आला आणि एकच खळबळ उडाली. यानंतर पुणे पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
या बाबत पत्रकारांशी संवाद साधताना उपायुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले,
“आज रोजी पोलीस कंट्रोल रुमला चार वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की, तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी घेऊन गेलं आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सर्व टीम सक्रिय झाली आहे. त्यानंतर तातडीने माहिती घेणं सुरु झालं आहे. ते पुन्ह्याहून फ्लाईटने गेले आहेत. फ्लाईट आता कोणत्या दिशेला जात आहे याचं कन्फर्मेशन सुरु आहेत. त्यांना परत आणण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे. याबद्दल सिंगल रोड पोलीस ठाण्याला अपहरणाची एफआयर दाखल करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने क्राईम ब्रांचकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणी सर्व माहिती मिळवली जात आहे. यापुढे काय माहिती मिळते ती माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली जाईल. ते सुखरुप येतील यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत”,
SL/ML/SL
10 Feb. 2025