माजी मुख्यमंत्री डॉ मनोहर जोशी यांचे निधन

 माजी मुख्यमंत्री डॉ मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते , माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ मनोहर जोशी यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. आज पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या 86 व्या वर्षी देवाज्ञा झाली. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम येथील रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 2 वाजता अंत्ययात्रा सुरू झाली. तत्पूर्वी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री , विविध राजकीय पक्षांचे नेते यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.

माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या सरांवर दादर इथल्या स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. गेल्या वर्षी मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती मात्र आज त्यांचे निधन झाले.

ML/KA/SL

23 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *