विदेशी पर्यटकांनी महाराष्ट्र दिली प्रथम पसंती

मुंबई, दि. २३ : भारतातील पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने आपले स्थान सिद्ध केले आहे. देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रने विदेशी पर्यटकांच्या बाबतीत पहिलं स्थान पटकावलं असून एकूण पर्यटक संख्येनुसारही राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. २०२३–२०२४ या कालावधीत महाराष्ट्रात ७० लाख विदेशी पर्यटकांनी भेट दिली, ज्यामुळे राज्याने दिल्ली, केरळ, गोवा आणि तामिळनाडूसारख्या पारंपरिक पर्यटन स्थळांना मागे टाकलं. ऐतिहासिक स्थळं, सांस्कृतिक वारसा, मुंबईसारखी महानगरे आणि विविध उत्सव यामुळे महाराष्ट्र हे जागतिक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
महाराष्ट्राने देशी आणि विदेशी पर्यटक मिळून एकूण ३५.७८ कोटी पर्यटकांची नोंद केली आहे. ही संख्या उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातनंतर चौथ्या क्रमांकावर आहे. ही कामगिरी राज्याच्या पर्यटन धोरण, सुविधा आणि विविधतेचं प्रतिक आहे.
गोवा, जो समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे, यंदा बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांपेक्षा मागे पडला आहे. ही घसरण पर्यटन धोरण, सुविधा, आणि पर्यावरणीय घटकांशी संबंधित असू शकते.
Foreign tourists give Maharashtra first preference MTDC
SL/ML/SL