परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या कारला लंडनमध्ये खलिस्तान्यांचा घेराव

 परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या कारला लंडनमध्ये खलिस्तान्यांचा घेराव

लंडन, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या लंडन दौऱ्यावर असून यादरम्यान काही खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या कारसमोर घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काल संध्याकाळी एस. जयशंकर लंडनमधील चॅथम हाऊसमधील एका बैठकीला उपस्थित होते. बैठक आटोपून ते बाहेर पडत असताना समोर रस्त्याच्या पलीकडेच काही खलिस्तान समर्थक घोषणाबाजी देत होते. कारमध्ये बसत असताना समोरच्या आंदोलकांमधून एक खलिस्तान समर्थक त्यांच्या कारसमोर आला आणि त्याने भारताचा राष्ट्रध्वज फाडला. यानंतर तिथे उभ्या असलेल्या लंडन पोलिसांनी त्याला बाजूला नेलं आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा ताफा पुढे रवाना झाला. मात्र, या प्रकारामुळे भारतीयांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.

खलिस्तान समर्थक तिरंगा फाडताना दिसताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि गाडीतून दूर नेले. दुसरीकडे, काही लोक हातात खलिस्तानचा झेंडा घेऊन घोषणा देत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे भारतीय समुदायात संताप आहे.

या घटनेनंतर लंडनमध्ये भारतीयांनी निदर्शने केली. भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लोक ब्रिटिश सरकारकडे करत आहेत. भारत सरकारनेही हा मुद्दा राजनैतिक पातळीवर उपस्थित करणे अपेक्षित आहे.परदेशात खलिस्तान समर्थक यापूर्वीही भारतविरोधी कारवाया करत आहेत. ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये भारतीय दूतावासाबाहेर अशा घटना घडल्या आहेत, ज्यावर भारत सरकारने आधीच निषेध व्यक्त केला आहे.

TM/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *