परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजाराला पसंती, सेन्सेक्स विक्रमी झेप

 परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजाराला पसंती, सेन्सेक्स विक्रमी झेप

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या अनेक मार्गांनी उर्जितावस्था प्राप्त होत आहे. त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदार देखील भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास आता जास्त पुढाकार घेत आहेत.
भारतीय शेअर बाजारात काल विक्रमी कामगिरी दिसून आली. या तेजीचे महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशी व भारतीय गुंतवणुकदारांनी एकाचवेळी केलेली खरेदी हे आहे.

असा प्रकार गेल्या दीड वर्षात फार कमी वेळा झाला आहे. आता या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ६,८८७ कोटींची गुंतवणूक केली आहे. तर भारतीय गुंतवणूकदारांनी ४,३२९ कोटी गुंतवले आहेत.भारतीय शेअर बाजार शुक्रवारी विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ६३,३८५ वर बंद झाला. ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.

१ डिसेंबर २०२२ रोजी विक्रमी पातळी गाठल्यानंतर शेअर बाजाराला नवी पातळी गाठण्यास ६ महिने लागले. तज्ज्ञांच्या मते, रिअॅल्टी आणि ऑटो क्षेत्राने गेल्या अडीच महिन्यांत भरघोस वाढ मिळवली. त्याचा परिणाम निर्देशांकावर दिसत आहे. दुसरीकडे रिटेल आणि एफआयआयचा इन्फ्लो गेल्या दोन महिन्यांपासून चांगला राहिला.

SL/KA/SL
17 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *