अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया अकाऊंट उघडण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य

नवीन दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क)
: कोरोनाकाळात शालेय अभ्यासक्रम आणि प्रोजेक्टसाठी अगदी लहानलहान मुलांच्या हाती मोबाईल द्यावे लागेल.त्यानंतर सर्व सुरळीत झाल्यावरही मुलांना लागलेली मोबाईलची सवय सुटणे कठीण झाले आहे. अनेक अल्पवयीन मुलांनी सोशल मीडियावर आपले अकाऊंटही उघडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता सरकारने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन धोरणामध्ये पालकांची परवानगी अनिवार्य केली आहे.
आता 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी त्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट (DPDP), 2023 अंतर्गत मसुदा नियम तयार केला आहे. हा मसुदा शुक्रवारी (3 जानेवारी) जनतेसाठी प्रसिद्ध करण्यात आला.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, Mygov.in वर जाऊन लोक त्यांच्या हरकती नोंदवू शकतात आणि या मसुद्याबाबत सूचनाही देऊ शकतात. 18 फेब्रुवारीपासून लोकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार केला जाईल.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X वर पोस्ट करून माहिती दिली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X वर पोस्ट करून माहिती दिली.
पालकांची संमती घेण्याची पद्धतही मसुद्यात नमूद करण्यात आली होती. सुमारे दीड वर्षांपूर्वी या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली होती. मसुद्यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, 2023 च्या कलम 40 च्या उप-कलम 1 आणि 2 अंतर्गत केंद्राला दिलेल्या अधिकारांच्या आधारावर नियमांचा मसुदा जारी करण्यात आला आहे.
पालकांची संमती मिळविण्याची प्रणाली देखील नियमांमध्ये नमूद केली आहे. मुलांनी त्यांचा डेटा कोणत्याही स्वरूपात वापरण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य असल्याचेही म्हटले आहे. या कायद्यात वैयक्तिक डेटा गोळा करणाऱ्या आणि वापरणाऱ्या कंपन्यांना ‘डेटा फिड्युशियरी’ म्हणतात.
मसुद्यानुसार, डेटा फिड्युशियरी कंपन्यांना मुलांच्या कोणत्याही वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यापूर्वी पालकांची संमती घेतली जाईल याची खात्री करावी लागेल. यासाठी कंपनीला योग्य तांत्रिक आणि संघटनात्मक उपाययोजना कराव्या लागतील.
SL/ ML/ SL
5 Jan 2025