अनुसूचीत जमातीचे अन्नत्याग आंदोलन

 अनुसूचीत जमातीचे अन्नत्याग आंदोलन

मुंबई दि.23(एम एमसी न्यूज नेटवर्क) : १९७६ पासून कोळी महादेव , डोंगर कोळी , कोळी मल्हार , कोळी ढोर , टोकरे कोळी या अनुसूचीत जमातींना ” अनुसूचीत जाती व जमाती आदेश ( सुधारित ) कायदा १९७६ नुसार संविधानीक अधिकार हक्क व लाभ मिळत नसल्यामुळे अनुसूचीत जमाती समितीने आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

सरकारने या समाजाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही.त्यामुळे हा समाज अजूनही आर्थिक , सामाजिक , शिक्षण , आरोग्य विकासापासून वंचित आहे.सरकारने आता या अन्नत्याग आंदोलनाकडे गांभीर्याने पहिले नाही तर पुढचे आंदोलन अजून तीव्र करू अशी माहिती अनुसूचीत जमातीचे किरण कोळी यांनी यावेळी दिली.

ML/KA/SL

23 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *