कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन
बुलडाणा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकरी नेते रविकांत तुपकर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 29 नोव्हेंबर रोजी शेकडो शेतकऱ्यांसह मुंबईमध्ये जाऊन मंत्रालयाचा ताबा घेणार असल्याचा इशारा दिला होता. आंदोलन मागे घ्या संदर्भात पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आपल्या आंदोलनावर ठाम असल्याने त्यांना काल बुलढाणा पोलिसांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले रात्री उशिरा त्यांची न्यायालयाने जामीनदार मुक्तता केली.
यानंतर काल रात्री दहा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील सोमठणा येथे तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनामध्ये सोमठाणा येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. जोपर्यंत कापूस सोयाबीनला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकरी नेते तुपकर यांनी घेतली आहे. Food abandonment movement for the demands of cotton, soybean farmers
ML/KA/PGB
26 Nov 2023