बुलडाणा जिल्ह्यात नदी नाल्यानां पूर.. ढगफुटी सदृश पाऊस..

बुलडाणा, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठ आणि नऊ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यानुसार रात्रीपासूनच बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे,या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुलावरून पाणी जात असल्याने खामगाव बुलडाणा आणि खामगाव जालना हे दोन्हीही महामार्ग सकाळी बंद होते .
खामगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला मिळतोय.. पिंपरी गवळी येथे मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक साहित्याच नुकसान झालय.. अनेक रस्त्यांना नदी नाल्याच स्वरूप आलय… तर किन्ही महादेव शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झालाय, यामध्ये शेतींना तलावांच स्वरूप आलं असून शेती खरडून गेल्याने पिकांच मोठा नुकसान झाल आहे.. गारडगाव नाल्याला पूर आल्याने गावठाण आणि गावातील नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे.
ML/ML/SL
7 July 2024