शेतीपिकांत साचले पाणी,शेतांना आले तळ्याचे स्वरूप…

जालना दि २०:– जालन्यात मुसळधार पावसामुळे शेतीपिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जालना जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिके पूर्णपणे जलमय झाली आहेत. पावसामुळे पाडळी शिवारातील शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.ML/ML/MS