गोसीखुर्द धरणाच्या विसर्गाने गडचिरोलीत पूर स्थिती

 गोसीखुर्द धरणाच्या विसर्गाने गडचिरोलीत पूर स्थिती

गडचिरोली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप बुधवारी थांबेल असा अंदाज खोटा ठरवत पावसाने पाचव्याही दिवशी पुन्हा जोरदार एन्ट्री केली. बुधवारी गडचिरोली शहरात दुपारी सुरू झालेला जोरदार पाऊस सायंकाळपर्यंत बरसत होता. त्यानंतरही रिमझिम वर्षाव सुरूच होता. त्यामुळे आधीच गोसीखुर्दच्या पाण्याने निर्माण झालेल्या पुरात भर पडली. एवढेच नाही तर अनेक सखल भागात पाणीही साचले होते.
दरम्यान आरमोरीत संततधार पावसामुळे काही घरांची पडझड झाली. भामरागडच्या पर्लकोटा नदीवर पुन्हा पुराचे पाणी चढल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.

पुरामुळे बंद असलेले मार्ग..

1)गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला ता. गडचिरोली (पर्यायी मार्ग गडचिरोली पोटेगाव कुनघाडा ते चामोर्शी )
2)आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड
3)गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (पाल नदी) ता. गडचिरोली
4) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) (मोदुमतूरा नाला) (देवलमारी नाला)ता. अहेरी
5) लखमापूर बोरी गणपुर रस्ता प्रजिमा (हळदीमाल नाला) ता. चोमोर्शी
6) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता प्रजीमा ता. चामोर्शी (पर्यायी मार्ग शंकरपुर हेटी मार्कडादेव)
7) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता, प्रजिमा ता. सिरोंचा
8) मानापुर अंगारा रस्ता प्रजिमा ता. कुरखेडा

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *