कोलाड परिसरात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती
अलिबाग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातील रात्री जोरदार पावसाने थैमान घातल्याने कुंडलीका नदीने तसेच महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळें अचानक गोवे गावात तर आंबेवाडी समर्थ नगर संभे येथील गौरी नगर मध्ये घराघरात शिरले. उडदवणे मार्गावर पाणी आले असून पालदाड पुल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
धाटाव एम आय डी सी कंपनीत पहिल्या पाळीला जाणणारे कामगार माघारी परतले आहेत. या ठिकाणी मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अधिक पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून नदी काठावरील गावांना भोंगा वाजवून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रोहा कोलाड मार्गावर पाले खुर्द नजीक मार्गावर देखील पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
ML/ML/SL
25 July 2024