योगाची तरंगती प्रात्यक्षिके

अकोला, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज 9 वा जागतिक योगदिन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे..अकोल्यात देखील मोठ्या उत्साहात आज योगदिन साजरा करण्यात आला तोही जरा वेगळ्या पद्धतीने..
अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील जल तरणतलावात अनेक वर्षांपासून येथील हौशी पोहणारे पाण्यात योगा करून योग दिवस साजरा करतात…जय श्री राम ग्रुपचे हे सर्व सदस्य आहेत,आज योगदिनी त्यांनी शवासन ,
पद्मासन, ताडासन , शीर्षासनसह अनेक योग पाण्यात केले… Floating Yoga Demonstrations
ML/KA/PGB
21 Jun 2023