रत्नागिरी जिल्ह्यातली विमानतळासह पाच कामे प्राधान्याने
रत्नागिरी, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पाच कामे प्राधान्यानं पूर्ण करणार असल्याचं खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय. खासदार झाल्यांनतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी आज कुडाळ इथं पत्रकार परिषद घेतली. रत्नागिरीचा पाणी प्रश्न, विमानतळ, रोजगार, पूर परिस्थिती आणि पर्यटन हे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचं राणे यांनी सांगितलं.
यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटणार असल्याचं राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील वेगवेगळे उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून इथे पर्यटन उद्योगाला चालना मिळावी यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगितलं. पर्यटन उद्योगासाठी वापरात येणाऱ्या विजेसाठी सवलत मीळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावेळी सांगितलं. आपल्याला निवडणून दिल्याबद्दल राणे यांनी विरोधकांसह सर्व मतदार आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. Five works including airport in Ratnagiri district on priority
ML/ML/PGB
15 Jun 2024