पाच वंदे भारत ट्रेन्सचा पंतप्रधानांकडून शुभारंभ

 पाच वंदे भारत ट्रेन्सचा पंतप्रधानांकडून शुभारंभ

भोपाळ, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): ​​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाच वंदे भारत ट्रेन्सचा शुभारंभ केला. मोदी यांनी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून, त्यांनी राणी कमलापती स्थानकावरून पाच वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला.एकाच दिवसात पाच सेमी हायस्पीड ट्रेन सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे आता देशातील वंदे भारत ट्रेन्सची एकूण संख्या २३ झाली आहे.

राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, बंगळुरू-हुबळी-धारवाड वंदे भारत, पाटणा-रांची वंदे भारत एक्सप्रेस, भोपाळ-इंदूर वंदे भारत ट्रेन आणि भोपाळ-जबलपूर वंदे भारत अशी नव्याने सुरू झालेल्या ५ एक्सप्रेसची नावे आहेत.

यामुळे मध्य प्रदेशला यावेळी दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. याशिवाय गोवा, बिहार आणि झारखंडला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. कर्नाटकला दुसऱ्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. बालासोर रेल्वे अपघातानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मडगाव-मुंबई वंदे भारत दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम आणि मडगाव येथे थांबेल.

5 नवीन वंदे भारत गाड्यांचे मार्ग

१.भोपाळ-इंदूर-भोपाळ वंदे भारत: इंदूर, उज्जैन, भोपाळ
२.RKMP-जबलपूर-RKMP वंदे भारत: राणी कमलापती, नर्मदापुरम, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर
३.पाटणा-रांची-पाटणा वंदे भारत: पाटणा, गया, कोडरमा, हजारीबाग, बरकाकाना, बीआयटी मेसरा
४. मडगाव-मुंबई वंदे भारत: गोव्यात पहिली वंदे भारत ट्रेन आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावेल.
५ धारवाड-बेंगळुरू वंदे भारत: धारवाड, हुब्बल्ली आणि दावणगेरेला राजधानी बेंगळुरूशी जोडेल.
SL/KA/SL
27 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *