लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

लोणावळा, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरल आहे. त्यातच आज रविवार असल्याने पर्यटकांनी भुशी डॅमवर मोठी गर्दी केली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅमवर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. आप्ताकालीन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनस्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्यांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील रेल्वेचा वॉटर फॉल ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याजवळ अन्सारी कुटुंब गेलं होतं. येथूनच अन्सारी कुटुंबातील पाचजण वाहून गेले. मृत्यू झालेल्यांमध्ये 36 वर्षीय महिला, 13 वर्ष, 8 वर्ष, 4 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
लोणावळ्यात गेल्या 24 तासांत 68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी मान्सून महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर लवकर दाखल झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. आता लोणावळ्यात पावसाचं पुनरागमन झाल्याने भुशी धरणही लवकरचं भरण्याची अपेक्षा आहे.
SL/ML/SL
30 June 2024