मुंबईत पाच नराधमांचा शाळकरी मुलीवर अत्याचार, दादर स्टेशनवर सापडली मुलगी

पुण्यातील स्वारगेट स्थानकात महिलेवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना मुंबईतही अशाप्रकारची घटना घडली आहे. मुंबईत एका शाळकरी मुलीवर सामुहिक अत्याचार करण्यात आले आहेत. या पाच आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला. याप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिला, मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.