अधिकमासाच्या एकादशीनिमित्त पंढरपुरात पाच लाख भाविक

 अधिकमासाच्या एकादशीनिमित्त पंढरपुरात पाच लाख भाविक

सोलापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुरुषोत्तम अधिकमासातील एकादशी निमित्त आज पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे या निमित्ताने संपूर्ण विठ्ठल मंदिर हे आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. सुमारे पाच टन फुलांपासून मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे यासाठी 12 प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.

पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी फुलांची सजावट सेवा विठ्ठल चरणी अर्पण केली आहे. पुरुषोत्तम अधिकमासात विष्णू देवतेची आराधना केली जाते विठ्ठल हे विष्णूचे प्रतीक असल्यामुळे पंढरपुरात सुमारे पाच लाख भाविक हे विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाले आहेत त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी आता विठ्ठलमय झाली आहे.

ML/KA/SL

29 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *