पाच बँकांनी रद्द केला बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा नियम

मुंबई, दि. ९ : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील ६ बँकांनी आता सरासरी मासिक शिल्लक (AMB) राखण्याचा नियम रद्द केला आहे. म्हणजेच आता खातेधारकांना बँकेच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करावी लागणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या दंडाची भीती राहणार नाही. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, एसबीआय यांनी बचत खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याचा नियम आधीच रद्द केला होता. आता बँक ऑफ बडोदा सारख्या बँकाही यामध्ये सामील झाल्या आहेत. यामुळे आता ग्राहकांना दरमहा बॅलन्स तपासण्याची आणि AMB राखण्याची आवश्यकता नाही. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना दिलासा मिळेल.
AMB म्हणजेच सरासरी मासिक शिल्लक. ही किमान सरासरी रक्कम आहे जी बँक खातेधारकांनी दरमहा त्यांच्या खात्यात राखावी अशी अपेक्षा करते. ग्राहक ही रक्कम राखू शकला नाही, तर बँक दंड आकारते. हे शुल्क खात्याच्या प्रकारावर आणि कमी रकमेच्या प्रमाणात म्हणजेच कमी रकमेवर अवलंबून असते.
SL/ML/SL