अलिबागजवळ भर समुद्रात मच्छीमार बोटीला आग

अलिबाग दि २८– अलिबाग जवळील भर समुद्रात आज सकाळी लागलेल्या आगीत मच्छीमार बोट ८० टक्के जळून खाक झाली असून बोटीवरील जाळी देखील जळाली आहेत, मात्र बोटीवर सर्व १८ खलाशी खलाशी सुखरूप आहेत. साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली असून आग विझविण्याचे काम कोस्ट गार्डच्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे.
आज पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान बोटीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, साखर आक्षी गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणली आहे. सध्या आग विझविण्याचं काम पूर्ण झाले आहे. साखर आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान इलेक्ट्रिक शॉक सर्किट होऊन आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणी मदतीला कोस्ट गार्ड आणि नेवीच्या बोटी मदतीला पोहोचलेल्या त्यामुळे सर्व खलाशी सुरक्षित आहेत.
ML/ML/SL
28 March 2025