मच्छिमार आणि मत्स्यपालन करणाऱ्यांनीही मिळणार KCC कर्ज
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किसान क्रेडीट कार्डाचा लाभ आता देशभरातील मत्स्यपालक आणि मच्छिमारांनांही घेता येणार आहे. याबाबतची घोषणा आज केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्रालयातील सहसचिव सागर मेहरा यांनी केली. मेहरा म्हणाले, ‘देशभरातील मत्स्य उत्पादक आणि मच्छिमारांना कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही बँकेत जावे लागणार नसून त्यांना किसान क्रेडिट कार्डवर (KCC) कर्ज मिळेल’. ‘हे कर्ज मत्स्यपालन करणारे शेतकरी आणि मच्छिमारांना घर बसल्या मिळेल’, असेही त्यांनी म्हटले आहे. देशभरातील मत्स्य उत्पादक आणि मच्छिमारांसाठी केंद्र सरकारने आज जन समर्थ पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलसाठी सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया सहकार्य करत आहे.
जन समर्थ पोर्टल उद्घाटना दरम्यान मेहरा म्हणाले, ‘सरकार मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील कर्ज प्रणाली डिजीटल करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असून जन समर्थ पोर्टलद्वारे मत्स्यपालक आणि मच्छिमारांना कर्ज सुविधा उपलब्ध करून दिले जाईल, असे म्हटले आहे. तसेच या पोर्टलद्वारे मत्स्यपालन विकासाला चालना मिळेल’.
यादरम्यान, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मच्छीमार आणि मत्स्यशेती करणाऱ्यांमध्ये सध्या जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यामुळेच आता पर्यंत मत्स्यपालक आणि मच्छिमारांची यात नोंदणी झाली आहे. तर आतापर्यंत जन समर्थ पोर्टलवर सुमारे ३ लाख किसान क्रेडिट कार्डची नोंद झाल्याची माहिती मेहरा यांनी दिली आहे.
पुढे मेहरा म्हणाले, ‘जन समर्थ पोर्टल आणि किसान क्रेडिट कार्ड यांच्या एकत्रीकरणातून मत्स्यव्यवसायात पारदर्शकता आणण्याच्या एका नव्या युगाची सुरुवात आहे’. तसेच ‘देशभरातील मच्छीमार आणि मत्स्यपालक या माध्यमातून घरी बसून कर्जासाठी सहजपणे अर्ज करू शकतात. तर घरी बसूनच ऑनलाइन खातेही हाताळू शकतात’, असे मेहरा यांनी म्हटले आहे.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रीय किसान क्रेडिट कार्ड (KCC) परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी पशुपालक आणि मत्स्यपालकांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप केले होते. या योजनेद्वारे २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री रुपाला यांनी दिली होती.
SL/ML/SL
19 March 2024