विदर्भात वाजली शाळेची पहिली घंटा

यवतमाळ दि २३–
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून विदर्भात आज शाळेला सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शाळेची पहिली घंटी वाजली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची गावकऱ्यांनी सजवलेल्या बैलबांडीत
वाजत गाजत मिरवणूक काढली.

यावेळी पालक तथा माता भगिनी ही मिरवणुकीत सहभागी झाल्या आणि वाजत गाजत नाचत विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचते केले. ML/ML/MS