राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला ?

 राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला ?

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राला लवकरच पहिल्या महिला पोलीस महासंचालक लाभणार असल्याची खात्रीशीर माहिती विशेष सूत्रांकडून मिळत आहे. IPS रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पदी नियुक्ती होण्याची खात्रीशीर शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, रजनीश सेठ यांनी व्हीआरएस घेऊन नवी जबाबदारी स्वीकारली आहे. सेठ हे येत्या डिसेंबरमध्ये रिटायर होणार होते. त्याआधी त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. त्यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचे अवैधरित्या फोन टॅप करुन देवेंद्र फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी याप्रकरणी कोर्टात भूमिका मांडली होती. राजकीय हेतून प्रेरित होवून आपलं नाव या प्रकरणात गोवण्यात आल्याचं रश्मी शुक्ला यांनी कोर्टात सांगितलं होतं.

याप्रकरणी कोर्टात रश्मी शुक्ला यांनी भूमिका मांडल्यानंतर कोर्टाने त्यांच्या विरुद्धचे फोन टॅपींगचे दोन्ही गुन्हे रद्दबातल ठरवले होते. याशिवाय सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्हे प्रकरणातही सर्व कारवाई थांबवण्यात आली होती. त्यानंतर शुक्ला यांची आता पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.

SL/KA/SL

3 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *