चिनाब नदीवरील सर्वात उंच पुलावरून स्वातंत्र्यदिनी धावणार पहिली ट्रेन

 चिनाब नदीवरील सर्वात उंच पुलावरून स्वातंत्र्यदिनी धावणार पहिली ट्रेन

जम्मू-काश्मिर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी पहिली रेल्वे गाडी धावणार आहे.सांगलदन ते रियासी दरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पाचा भाग आहे.चिनाब नदीवरील हा पूल पॅरीसच्या आयफेल टॉवरहूनही उंच आहे. आयफेल टॉवरची उंची ३३० मीटर आहे. तर हा पूल ३५९ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे.पुलाची लांबी १.३ किलोमीटर एवढी आहे.

या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूल ४० किलोपर्यंतची स्फोटके आणि ८ रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाचे धक्के सहन करू शकतो.पाकिस्तानी सीमेपासून या पुलाचे हवाई अंतर अवघे ६५ किलोमीटर इतके आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर काश्मीर खोरे भारताच्या अन्य भागांशी रेल्वेद्वारे जोडले जाणार आहे.१९९७ साली या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. या वर्षाच्या अखेरीस रियासी ते कटरा यांना जोडणारा शेवटचा १७ किलोमीटरचा टप्पा पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रवाशांना जम्मूतील रियासी ते काश्मीरमधील बारामुल्ला असा प्रवास करता येणार आहे.

20 जून रोजी या पुलावर ट्रेनची ट्रायल रन झाली. यापूर्वी 16 जून रोजी या पुलावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली होती. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 29 मीटर उंच आहे. आयफेल टॉवरची उंची 330 मीटर आहे, तर 1.3 किमी लांबीचा हा पूल चिनाब नदीवर 359 मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे.

19 July 2024

ML/M/SL

19 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *