पहिली तृतीयपंथी वकील करणार मतदार जनजागृती
वर्धा, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून २०२४ मधील विधानसभा, लोकसभा निवडणुका लक्षात घेत जास्तीत जास्त तरुणांनी मतदार नोंदणी करण्यासाठी तरुणांना ‘इनकरेज’ करण्यासाठी विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील ठरलेली ऍड. शिवानी सुरकार हिची वर्धा जिल्हा ‘आयकॉन’ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ही नियुक्ती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या आदेशानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी केली आहे.
वर्धा जिल्ह्यात तरुण मतदारांनी अधिकाधिक नोंदणी करावी, यासाठी आयकॉन म्हणून अँड. शिवानी सुरकार हिची आयकॉन’ म्हणून नियुक्ती केली आहे.
विविध बूथ केंद्रावर जाऊन तिच्याकडून जनजागृती केली जाणार आहे. तरुणांनी नवमतदारांनी मतदार यादीत आपली नाव नोंदविण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम ती करणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा निवडणूक कार्यालयाला देखील सहकार्य मिळणार आहे असे मत प्रवीण महिरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, वर्धा, यांनी व्यक्त केले.
ML/KA/SL
10 Dec. 2022