गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण

 गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण

श्रीहरीकोटा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था चांद्रयान आणि मिशन आदित्य या मोहिमांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता गगनयान या अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रमावर काम करत आहे. इस्त्रोच्या या मोहिमेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. श्रीहरिकोटा येथून गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आलं असून गगनयान 400 किलोमीटरपर्यंत अवकाशात झेपावलं आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारतानं अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे. इस्त्रोच्या या गगनयानचं श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज लॉन्चिंग केलं जाणार होतं. यासाठी काउंडाऊन सुद्धा मात्र, खराब हवामान आणि काही तांत्रिक अडचणींमुळे काही मिनिटांसाठी लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलं. या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर गगनयानचं उड्डाण करण्यात आलं आहे.

इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे. गगनयान’ या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात आली. या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी या चाचण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे. ‘टीव्ही-डी१’मध्ये सुधारित विकास इंजिनाचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात ‘क्रू मोड्यूल’ आणि ‘क्रू एस्केप सिस्टिम’ ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान ३४.९ मीटर उंच आहे आणि त्याचे वजन ४४ टन आहे.

गगनयानाची पहिली चाचणी यशस्वी होताच इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी एकमेकांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात आलं आहे. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल.

SL/KA/SL

21 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *