पहिले श्री संत चोखोबाराय मंदिर लोकर्पित, संत विद्यापीठ घोषित …
बुलडाणा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परमेश्वराच्या भक्तीतून दैवत्वाकडे जाणारी वारकरी परंपरा ही महाराष्ट्रासाठी अनमोल ठेवा आहे. हा ठेवा जपण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांकडे नेण्यासाठी सरकार संत विद्यापीठाची उभारणी करत आहे अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील इसरुळ येथे श्री संत चोखोबाराय यांच्या मंदिर उभारल्या गेले आहे या मंदिरात चोखोबाराय यांच्या पंचधातू मुर्तीची स्थापना आणि मंदिराचा कलशारोहण सोहळा आज आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
मंत्री संदिपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, आ संजय गायकवाड, हरिभाऊ बागडे, संजय रायमुलकर हेही यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की संत वारकऱ्यांचा वारसा पुढे नेणारे हे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे .
चोखोबांचे पहिलेच मंदिर
महाराष्ट्रातील पहिलं चोखोबाचं मंदिर इसरुळ या ठिकाणी बांधण्यात आले असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .. तर संत चोखोबांच्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त याठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच हभप रामराव महाराज ढोक यांच्या वाणीतून श्रीराम कथा सुद्धा आयोजित करण्यात आले होते.
Ml/KA/SL
12 May 2023