इस्रोची ऐतिहासिक कामगिरी पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण
श्रीहरीकोटा,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून आज पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. स्कायरूट एरोस्पेस कंपनीच्या या रॉकेटचं नाव विक्रम सबऑर्बिटल असं आहे. स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी स्टार्ट अप योजनेंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला इस्रो आणि इन स्पेस या केंद्रानेही मदत केली.
विक्रम सबऑर्बिटल रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी झेप घेतली. निश्चित केलेल्या लक्ष्यानुसार, ५४५ किलो वजनाचं हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. या रॉकेटला दिलेलं विक्रम एस हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून दिलं आहे.