पहिला महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांना

 पहिला महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांना

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार स्थापन केला असून हा पहिलाच पुरस्कार जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाल्याची माहिती अशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.

यासह तरुण, महिला आणि मराठी उद्योजकांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, यामुळे उद्योग जगतात महत्वाचं स्थान अधोरेखित होईल असं त्यांनी सांगितलं. First Maharashtra Udyog Bhushan Award to Ratan Tata

सरकारने केलेल्या उपायोजनांमुळे गेल्या ११ महिन्यात राज्यात १लाख १८ लाख ४२२ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकांचं राज्य बनलं आहे असं सामंत यांनी सांगितलं.

मागच्या काळात उद्योगधंदे राज्याबाहेर का गेले यासंदर्भात याच अधिवेशनात श्वेतपत्रिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बारा बलुतेदारांच्या उद्योगांच्या वाढीसाठी रायगड जिल्ह्यात महाड आणि रत्नागिरीला प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवला जाईल आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.

राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीने, उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मैत्री कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करणारं महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं यावेळी झालेल्या चर्चेला सामंत यांनी उत्तर दिलं.

या कायद्यामुळे उद्योजकांनी अर्ज केल्यावर परवानगी देण्यासाठी संबंधित प्रत्येक खात्याला कालावधीची मर्यादा घालण्यात आली आहे. या परवानग्या विहित कालावधीत न दिल्यास उद्योग विभागाच्या आयुक्त्यांना हे अधिकार जातील असं सामंत यांनी सांगितलं.

ML/KA/PGB
27 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *