कोरोनाची पहिली इंट्रानेझल लस लाँच

 कोरोनाची पहिली इंट्रानेझल लस लाँच

मुंबई,दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत बायोटेकची नाकावाटे दिली जाणारी कोरोना व्हॅक्सिन लाँच करण्यात आलेली आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ही लस लाँच करण्यात आली.

भारत बायोटेकची ही नोजल व्हॅक्सिन सरकारला ३२५ रुपये प्रतिडोसने उपलब्ध होईल. तर खाजगी रुग्णालयांमध्ये याची किंमत ८०० रुपये असेल. या व्हॅक्सिनचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने घेता येणार आहेत. कोविन पोर्टलवर ही नोजल व्हॅक्सिन बुक करता येईल.

जगात सर्वप्रथम भारतानेच नोजल व्हॅक्सीनला परवानगी दिली आहे. आता नाकात स्प्रे करून कोरोनाविरुध्द वॅक्सीनेशन केलं जाणार आहे. त्यामुळे इंजेक्शनची भीती वाटणारे लोकही हे व्हॅक्सीन सहज घेऊ शकतात.

 

SL/KA/SL

26 Jan. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *