शिवसेना कोणाची -पार पडली पहिली सुनावणी
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बऱ्याच काळापासून भिजत पडलेल्या शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे दाखल करण्यात आलेल्या दाव्याची आज प्राथमिक सुनावणी पार पडली. शिवसेनेचा धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचं यावर आज (१२ डिसेंबर) मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुनावणी झाली.
यावेळी निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे.
अनिल देसाई म्हणाले, “मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुनावणी झाली. त्यांनी दोन्ही बाजुंचं म्हणणं ऐकलं. त्यावर आज सुनावणी होईल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, मुख्य सुनावणीबाबत इतर अनेक कागदपत्रे सादर झाली होती. तसेच आणखी दोन ते तीन अर्जही आले होते. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी सुरू होईल, असं सांगितलं.”
SL/KA/SL