वक्फ कायद्यांतर्गत पहिली धडक कारवाई

भोपाळ, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर नुकताच वक्फ कायदा लागू झाल्यानंतर आता याबाबत देशभरातून पुढे आलेली प्रकरणे मार्गी लागण्याचे काम आता सुरु झाला आहे. या अंतर्गत पहिली कारवाई मध्यप्रदेशात झाली आहे. पन्ना जिल्ह्यात अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेल्या मदरशावर हातोडा चालविण्यात आला आहे. विशेष म्हणजे मदरशा चालविणाऱ्यांनीच स्वतःहून पुढाकार घेऊन मदरशाचे पाडकाम केले. पन्ना जिल्ह्यातील बीडी कॉलनी येथे सरकारच्या जागेवर मागच्या ३० वर्षांपासून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता हा मदरसा सुरू होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक मुस्लीम रहिवाशाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर यंत्रणानी या मदरशाची दखल घेतली होती. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी मदरशाच्या संचालकांनी स्वतःहून बुलडोझरने मदरशाचे पाडकाम केले.
काही वर्षांपासून मदरशाला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र प्रदीर्घ कायदेशीर कार्यवाहीमुळे हा प्रश्न सुटला नव्हता. या मदरशाला ग्रामपंचायतीची परवानगी असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले होते. मात्र आता हा परिसर महानगरपालिकेच्या अखत्यारित गेल्यामुळे सदर मदरशा अनधिकृत असल्याचा निर्वाळा देण्यात आला. वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या उद्देश वक्फ मालमत्तेवर अतिक्रमणांचे नियमन करणे आणि अशा मालमत्तांचा पारदर्शक आणि कायदेशीररित्या वापर केला जाईल, याची खात्री करणे असा आहे.
भाजपाचे नेते व्हीडी शर्मा यांनी यांनी माध्यमांना सांगितले की, मुस्लीम समुदायाच्या काही सदस्यांनी याबद्दल तक्रार केली होती. वक्फच्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेऊन तिथे अनैतिक कृत्ये सुरू असल्याची बाब निदर्शनास आणून दिली गेली. नव्या वक्फ कायद्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी राखून ठेवलेल्या मालमत्तांचा आता योग्य वापर होणार आहे. अशाप्रकारे मालमत्तांचा गैरवापर आणि निधीच्या होणाऱ्या अपहारात यामुळे चाप लागणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू होत असताना अशाप्रकारची कारवाई इतर प्रकरणांसाठी उदाहरण ठरू शकते.
SL/ML/SL
13 April 2025