मांसाहारास पूर्ण बंदी घालणारं जगातील पहिलं शहर

भावनगर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
शाकहार चांगला की मांसाहार? या विषयी मतमतांतरे दिसून येतात. अनेक वर्ष मांसाहार करणारे लोकं आरोग्य विषयक तसेच अन्य कारणास्तव मांसाहार सोडताना दिसतात. तर पिढ्यांनपिढ्या शाकाहार करणाऱ्या व्यक्ती मांसांहार स्वीकारतानाही दिसतात. शेवटी काय तर कोणत्या प्रकारचे अन्न खावे हा व्यक्तिगत प्राधान्यक्रम आहे. मात्र काही ठरावीक ठिकाणी धार्मिक कारणांस्तव मांसाहारावर बंदी असल्याचेही दिसून येते. असेच एक उदाहरण गुजरातमधील भावनगरमधील एका शहराचे आहे. हे मांसाहार बंदी असणारं जगातलं पहिलं शहर ठरलं आहे.
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातल्या पालिताना या शहरात मांसाहार खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मांसाहारास बंदी घालणारं हे जगातील पहिलं शहर आहे.पालिताना शहरात हा निर्णय जाहीर होण्याचं कारणही विशेष आहे. जवळपास 200 जैन साधूंनी सातत्यानं या विषयावर आवाज उठवल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला. जैन समाजात अहिंसा हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. या समाजातील साधूंनी शहरातील 250 कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली होती. या विषयावर त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारनं पालिताना हे शाकाहारी शहर घोषित केलं.
नॉन व्हेज खाण्यास बंदी असलेलं पालिताना हे जैन धर्मीयांच्या सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. या शहराला ‘जैन मंदिर शहर’ हे नाव देखील मिळालं आहे. शत्रूंजय पहाडाजवळ वसलेल्या या शहरात 800 पेक्षा जास्त मंदिरं आहेत. त्यामध्ये आदिनाथ मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. या मंदिराला दरवर्षी हजारो भक्त तसंच पर्यटक भेट देतात. गुजरातमधील पालिताना शहरात मांसाहारी खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मांस पाहणे हे त्रासदायक होते. त्याचा लोकांवर विशेषत: मुलांवर नकारात्मक परिणाम होतो, असा दावा या बंदीची मागणी करणाऱ्या व्यक्तींनी केला होता.
ML/ML/SL
18 July 2024