जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये गोळीबार
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांची आजची सकाळ एका धक्कादायक बातमीने झाली. जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाला असून यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या 12956 जयपूर एक्स्प्रेसच्या बी ५ या डब्यात गोळीबार झाला. या घटनेत RPF ASI टीकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गोळीबार एका RPF जवानाने केला आहे.
गोळीबार ज्या RPF जवानाने केला त्याचं नाव चेतन असून त्याला अटक करण्यात आली आहे. गोळीबार केल्यानंतर त्याने उडी मारली. मात्र त्याला मीरा रोड ते बोरीवलीच्या दरम्यान अटक करण्यात आली. त्याची बंदुकही जप्त करण्यात आली.
धक्कादायक घटनेचे तपशील
एक्सप्रेस ट्रेन पालघर स्थानक सोडून विरारच्या दिशेने येत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. वापी स्थानकात चेतन सिंह या रेल्वे कॉन्स्टेबलचा बी-५ बोगीतील प्रवाशांशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला पोहोचला की, चेतन सिंह याने या प्रवाशांवर रिव्हॉल्व्हर रोखली. यावेळी बोगीत असणारे रेल्वे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक टिकाराम मीणा त्याठिकाणी धावत आले. त्यांनी चेतनची समजूत काढत त्याला प्रवाशांवर गोळ्या झाडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मानसिक तोल सुटलेल्या चेतन सिंह याने पहिले टिकाराम मीणा यांच्यावरच गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
SL/KA/SL
31 July 2023