कळमना एपीएमसीत मिर्ची बाजारात आग

 कळमना एपीएमसीत मिर्ची बाजारात आग

नागपूर, दि. २३ :नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास मिर्ची मार्केटला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेड मधील मिर्ची पूर्णतः जळून खाक झालेली आहे.

या आगीत अंदाजे दोन ते तीन कोटीच्या घरात सुखी मिर्ची जळून नुकसान झालं आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असाच प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिर्चीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. Fire at the pepper market in Kalmana APMC Nagpur

याच ठिकाणी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे. कालच या शेडमध्ये इलेक्ट्रिक दुरुस्तीचे काम करण्यात आलं होतं. त्यानंतर मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे एक भीषण दुर्घटना घडवून कोट्यावधी रुपयाची मिर्ची जळून खाक झाली आहे.

मध्यरात्री दोन वाजता पासून आग विझवण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमक बंबाकडून पाण्याचा मारा केला जात आहे. जवळपास आठ बंब सुमारे दोन ते तीन फेऱ्या करून पाण्याचा मारा सुरू आहे. आताही मिर्चीमध्ये आग धुसमत असल्याने सध्या कुलिंग प्रोसेस सुरू आहे. या संदर्भात प्राथमिक अंदाजातून चार हजार पोते मिरची जळलेली असल्याचं सांगितलं जात आहे.

ML/KA/SL

23 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *