72 हुरें’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकाविरोधात FIR दाखल

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात धार्मिक भावना दुखावणाऱ्या चित्रपटांचे पेव फुटले आहे. संजय पूरण सिंग दिग्दर्शीत 72 हुरें’ चित्रपटावरून आता वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 28 जून रोजी रिलीज झाला होता. कट्टरतावाद्यांच्या मोहात पडून तरुण कसे आत्मघातकी बॉम्बर बनतात, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अरिफअली महमूदअली यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात ‘72 हुरें’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात एका विशिष्ट समुदायाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. अशोक पंडित, गुलाबसिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर आणि किरण डागर हे त्याचे निर्माते आहेत.
त चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पूरण सिंग आणि अशोक पंडित यांच्यासह चार निर्मात्यांवर धर्माचा अपमान आणि विशिष्ट समाजाची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच एफआयआरमध्ये मेकर्सवर बनावट प्रचाराद्वारे पैसे कमावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
SL/KA/SL
4 July 2023