अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप, रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशीष चंचलानीसह ५ जणांवर FIR दाखल

 अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप, रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशीष चंचलानीसह ५ जणांवर FIR दाखल

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टॅन्ड अप कॉमेडियन समय रैनाचा कॉमेडी शो ‘इंडिया गॉट लेटेंट’ मध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया याच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया याने एक अश्लील वक्तव्य केलं आहे. यामुळे रणवीर अलाहबादिया, समय रैना, अपूर्वा मखीजा, आशिष चंचलानी आणि आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर आणि समय यांच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शोमध्ये अश्लील शब्दांचा वापर केल्याने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच ‘इंडिया गॉट लेटेंट’ यांच्या आयोजकांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

समय रैना आणि इतर क्रिएटर्संविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी मुंबई पोलीस रणवीर अलाहाबादियाच्या घरी गेले होते. रणवीर अलाहाबादियावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्सोवा ठाण्यातील पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली. रणवीर अलाहाबादियावर आणि समय रैनावर आता प्रचंड टीका होऊ लागली आहे. त्याचबरोबर मुंबई, महाराष्ट्रासह इतर ठिकाणीही त्याच्या गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या शोला होणाऱ्या विरोधामुळे आणि शो बंद करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता नक्की काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या संदर्भात महाराष्ट्र सायबर सेलनं युट्यूबला पत्र पाठवलं आहे. शोमधली आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच कारवाई करण्यात आलेल्यांना लवकरच नोटीस बजावून चौकशीला बोलवलं जाणार आहे. तसेच शो बंद करण्याची मागणी केली जात आहे.

SL/ML/SL11 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *