अर्थमंत्री निर्मला सीतारामन रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ६३ वर्षीय सीतारामन या नेहमीच्या तपासण्यांसाठी दुपारी 12 च्या सुमारास त्या रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एएनआयने दिलेल्या बातमीनुसार, अर्थमंत्री सीतारामन यांच्या पोटात हलकासा संसर्ग झाला होता. तसेच त्यांच्या नियमित तपासण्या देखील आज होणार होत्या. त्यामुळे त्यांना दिल्लीमधील एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
SL/KA/SL
26 Dec. 2022