अखेर जायकवाडी साठी पाण्याचा विसर्ग सुरू

 अखेर जायकवाडी साठी पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक, दि.25(एमएमसी न्यूज नेटवर्क) :
सततच्या कमी पावसामुळे त्रस्त असलेल्या मराठवाड्याच्या पाण्याचा आता बरचसा मार्गी लागणार आहे.

नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये पहिला विसर्ग १०० क्युसेक्सने करण्यात आला असून रात्री ११ वाजता पाणी सोडण्यात आले. मराठवाड्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात (Dam) पाणी सोडायला सुरुवात झाली. पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर २५ दिवस उशिराने का होईना नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पहिल्या टप्प्यात शुक्रवारी रात्री १० वाजेनंतर नाशिकच्या दारणा धरणातून १०० क्यूसेकने विसर्ग सुरू झाला. नंतर त्यात गरजेनुसार वाढ करण्यात येणार आहे. पाठोपाठ नगरच्या धरणातूनही विसर्ग केला जाईल. दरम्यान, हे पाणी जायकवाडी धरणात येईपर्यंत ४८ तास लागतील. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी येणे अपेक्षित होते. Finally, the discharge of water for Jayakwadi has started
SL/ KA/ SL
25 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *