अखेर राहुल गांधी यांनी सरकारी बंगला सोडला

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासदार म्हणून अपात्र ठरलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचा सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले होते. आता राहुल गांधी यांचे अधिकृत निवासस्थान खाली करताना दिसत आहेत. आता ते त्यांची आई सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी जात आहेत.
सरकारी निवासस्थान रिकामे करण्यासाठी त्यांना 22 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली होती.
12 तुघलक लेन हा बंगला 2005 मध्ये राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील अमेठीमधून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना देण्यात आला होता. राहुल गांधी यांना 23 मार्च रोजी लोकसभेतून अपात्र घोषित करण्यात आले आणि नियमानुसार, अपात्र ठरलेल्या खासदाराला सरकारी निवासस्थान मिळू शकत नाही आणि त्याला अधिकृत बंगला रिकामा करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला जातो.
“ते (भाजप) माझे घर घेऊ शकतात आणि मला तुरुंगात टाकू शकतात, परंतु ते मला वायनाडच्या (केरळमधील मतदार संघ) लोकांचे आणि त्यांच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाहीत,” असे राहुल गांधी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या माजी मतदारसंघाला भेट देताना सांगितले.
SL/KA/SL
15 April 2023