काँग्रेसच्या बैठकीत अखेर थोरात सामील
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज मुंबईत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नाराज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहिले . विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे प्रकरणा नंतर प्रदेशाध्यक्ष आणि त्यांची ही पहिलच भेट आहे.Finally joined Thorat in the Congress meeting
आमच्यात कोणाची ही काही नाराजी नाही, बघा बाळासाहेब थोरात आमच्या सोबतच बसले आहेत, असे सांगत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेची सूरुआत केली आणि काँग्रेसमध्ये सगळे आलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.
या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सांगितलं की आजच्या बैठकीत राज्य आणि केंद्र सरकार विरोधात काही ठराव मंजूर करण्यात आले. एका पत्रकाराची हत्या आणि बी बी सी वृत्तसंस्थेची आई टी चौकशी हे सगळे प्रकार कसे घडताहेत याचा बैठकीत निषेध ठराव करण्यात आला असेही नाना पटोले म्हणाले.
सत्यजित तांबे प्रकरणा वरून प्रचंड नाराज असणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा थेट दिल्लीत पाठवून पटोले यांच्या कार्य पद्धतीवर जोरदार टीका केली होती. मात्र पक्षाचे निरीक्षक के एच पाटील यांच्याशी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर थोरात यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे.
ML/KA/PGB
15 Feb. 2023